मुंबईतील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी, मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 14 Oct 2024
  • 12:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांना पूर्णत: माफ करण्यात आला आहे. ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर या टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी असेल. 

दरम्यान, हा निर्णय केवळ निवडणुकीपुरता नसून कायमचा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आज रात्री १२ वाजेपासून हा निर्णय लागू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

या बैठकीय मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफी, कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा तसेच आगरी समाजासाठी महामंडळ सुरू करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ केले जाणार असून आज रात्री १२ वाजेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची यादी :

१. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्री १२ वाजेपासून अंमलबजावणी.

२. आगरी समाजासाठी महामंडळ

३. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

४. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

५. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

६. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

७. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

८. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

९. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

१०. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

११. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

१२. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

१३. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

१४. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

१५. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

१६. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

१७. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

१८. ‘उमेद’साठी अभ्यासगट

१९. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest