यापूर्वीही शिंदेंकडून बेईमानीचा प्रयत्न : संजय राऊत

बेईमानी आणि गद्दारीची बीजे साडेतीन वर्षांपासून रोवली गेली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही असे घडले होते, असे सांगत एकनाथ िशंदे यांनी यापूर्वीही पक्षाशी बेईमानी करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 10 Apr 2023
  • 12:52 pm
यापूर्वीही शिंदेंकडून बेईमानीचा प्रयत्न : संजय राऊत

यापूर्वीही शिंदेंकडून बेईमानीचा प्रयत्न : संजय राऊत

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काॅग्रेस प्रवेशासाठी अहमद पटेल यांना भेटल्याचा दावा

#मुंबई

बेईमानी आणि गद्दारीची बीजे साडेतीन वर्षांपासून रोवली गेली होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही असे घडले होते, असे सांगत एकनाथ िशंदे यांनी यापूर्वीही पक्षाशी बेईमानी करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला.

शिंदे हे काॅग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत होते, असे सुचवून राऊत म्हणाले, ‘‘हे लोक अहमद पटेल यांना भेटले होते. त्यांच्या बैठकादेखील झाल्या होत्या. त्यांच्या डोक्यातला हा जो बेईमानीचा किडा आहे तो जुना आहे.’’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४०आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी राऊत यांनी हा गौप्यस्फोट केला.  

संजय राऊत म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आहेत. त्यांना आम्हीच घेऊन गेलो होतो. तुम्हाला रामाची आठवण आत्ता झाली. तुम्ही सुरत-गुवाहाटीला जाण्याऐवजी अयोध्येला गेला असता आिण प्रभू श्रीरामचंद्राला कौल लावला असता तर रामाने कधीच असत्याच्या बाजूने कौल दिला नसता.’’

आज तुम्ही भाजपसोबत अयोध्या येथे गेलात याचा आनंदच आहे. मात्र गेल्या ७२ तासांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी त्रस्त आहेत. अधिवेशनात काही घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघाले आहेत. हे ढोंग आहे. प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना मिळणार नाही. महाराष्ट्राचे प्रश्न वाऱ्यावर सोडून हे अयोध्येला गेले आहेत, असा आरोपही 

राऊत यांनी केला.  प्रभू श्रीराम यांना सुबुद्धी देवो आणि राज्याला चांगले दिवस येवो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संजय राऊत म्हणाले, ‘‘बाबरीच्या वेळी भाजपचे लोक आमच्यासोबत आले नाही. आता गद्दारांसोबत गेले. महाराष्ट्रात 

आल्यावर पाहा सरकारचे काय होते. भाजपने स्पॉन्सर्ड केलेला हा दौरा आहे. ते आमची कॉपी करत आहेत. मात्र कोण खरे कोण खोटे हे जनतेला माहित आहे.’’ वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest