धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारला अपघात, ट्रॅव्हल्स बसला धडक

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 17 Oct 2024
  • 01:31 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी या ठिकाणी गुरुवारी पहाटे ही घटना घडली.  राजश्री मुंडे या पुण्याहून बीडच्या दिशेने जात होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बस मध्ये भीषण धडक झाली. या अपघातात राजश्री मुंडे या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

पुणे सोलापूर महामार्गावर मुंडे यांची कार आणि  ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. या अपघातामुळे  महामार्गावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.  या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालं नसून पोलीस पूढील तपास करत आहेत.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest