विधवेला पूर्णांगी म्हणा

पतीच्या निधनानंतर सदर विवाहितेसाठी विधवा हा शब्द वापरणे अपमानास्पद आहे. विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द त्यांचा सन्मान करणारा आहे. त्यामुळे विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरावा अशी शिफारस राज्य महिला आयोग सरकारला करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रविवारी चिंचवड येथे केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 6 Mar 2023
  • 02:46 am
विधवेला पूर्णांगी म्हणा

विधवेला पूर्णांगी म्हणा

आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांचे मत

#पुणे

पतीच्या निधनानंतर सदर विवाहितेसाठी विधवा हा शब्द वापरणे अपमानास्पद आहे. विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द त्यांचा सन्मान करणारा आहे. त्यामुळे विधवा शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द कायमस्वरूपी वापरावा अशी शिफारस राज्य महिला आयोग सरकारला करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रविवारी चिंचवड येथे केली. 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील दिशा महिला फाऊंडेशनने चार चौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शकांशी मनमोकळ्या गप्पांचा आणि विविध क्षेत्रांतील महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी चाकणकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना वरील मत व्यक्त केले. रामकृष्ण मोरे नाट्यगृहातील या कार्यक्रमास     

आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आदी उपस्थित होते. उत्तरार्धात ज्येष्ठ पत्रकार राज काझी यांनी कलावंतांची मुलाखत घेतली. या वेळी आमदार अश्विनी जगताप, कवयित्री संगीता झिंजुरके, राष्ट्रीय पुरस्कार विजेती बालकलाकार आकांक्षा पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

चाकणकर म्हणाल्या की, १७५ वर्षांपूर्वी जोतिबांच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. दुर्दैवाने सावित्रीबाई आम्हाला किती समजल्या हा प्रश्न आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी योगदान दिले, लढा दिला, परंतु आम्ही बदललो का हा प्रश्न आहे. आमची वेशभूषा बदलली. घर, गाड्या, रस्ते बदलले. परंतू आमच्यातील माणूस बदलला नाही, ही खरी शोकांतिका आहे. समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी महिलांचे मूळ प्रश्न कायम आहेत. समाजात मुलींच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करताना आम्ही काटकसर करतो. मात्र हुंड्यासाठी वारेमाप कर्ज काढतो. शिक्षण आणि तिचे कर्तृत्व ह्याच गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही, तर महिलाच महिलांना त्रास देत असल्याचे दिसत आहे. 

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest