अहमदनगर जिल्हा बँकेत भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

राज्यात अग्रगण्य असणाऱ्या अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी (दि. ८) बाजी मारली. कर्डिले यांना दहा मते तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 04:00 pm
अहमदनगर जिल्हा बँकेत भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

अहमदनगर जिल्हा बँकेत भाजपचा राष्ट्रवादीला धक्का

विखे-पिता पुत्राची खेळी ठरली यशस्वी

#अहमदनगर

राज्यात अग्रगण्य असणाऱ्या अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेत अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुधवारी (दि. ८) बाजी मारली. कर्डिले यांना दहा मते तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली.

कर्डिले हे विखे गटातील नेते म्हणून ओळखले जातात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत  विखे-पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष उदय शेळके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक पार पडली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या २०सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपकडून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात होते.  

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगर मध्ये बैठक घेऊन चर्चा केली होती. अध्यक्षपद आपल्याकडे यावे, यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चेबांधणी केली असताना भाजपने यात बाजी मारली. विखेंच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे कर्डिले यांनी १० मते घेत विजय मिळवला.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest