बागेश्वरबाबांची जीभ घसरली...

गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वरबाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करताना रविवारी साईबाबांच्या भक्तांचा रोष ओढवून घेतला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांबद्दल ‘‘गिधाडाचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही,’’ अशा प्रकारचे वक्तव्य बागेश्वरबाबा यांनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:23 am
बागेश्वरबाबांची जीभ घसरली...

बागेश्वरबाबांची जीभ घसरली...

साईबाबांविषयी वादग्रस्त विधान; म्हणाले, गिधाडाचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही

#जबलपूर

गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वरबाबा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करताना रविवारी साईबाबांच्या भक्तांचा रोष ओढवून घेतला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांबद्दल ‘‘गिधाडाचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही,’’ अशा प्रकारचे वक्तव्य बागेश्वरबाबा यांनी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

जबलपूर येथील एका कार्यक्रमात शिर्डीच्या साईबाबांची पूजा करावी की नाही, अशी विचारणा एका भक्ताने केली. त्यावर बागेश्वरबाबा म्हणाले, ‘‘हिंदू धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण शंकराचार्य हे धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असोत अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही. गिधाडाचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही. ’’

यानंतर उपस्थित भक्तांना संबोधित करताना बागेश्वरबाबांनी आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, असे नमूद केले. ‘‘मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. परंतु मी हे बोलणेदेखील गरजेचे आहे की, गिधाडाचे कातडे पांघरून कोणी सिंह होत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील पण हे बोलणे खूप गरजेचे आहे. संतांची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरुष आहेत. परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही,’’ असे ते म्हणाले.

 बागेश्वरबाबांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, यावरून भाजपवरही टीका केली आहे. ‘‘निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधाने करायला लावायची... जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा तसेच नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचे 

आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचे पहिल्यापासूनच धोरण राहिले आहे. भाजपने बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’’ असे रोहित पवार म्हणाले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest