उद्धव भेटीनंतर आनंद दिघे मृत घोषित

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी केलेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद अजून उमटत आहेत. त्यातच शिवसेना (शिंदे गट) नेत्या, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत त्या म्हणाल्या की, आनंद दिघेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 11:45 am
उद्धव भेटीनंतर आनंद दिघे मृत घोषित

उद्धव भेटीनंतर आनंद दिघे मृत घोषित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

#ठाणे

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी केलेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद अजून उमटत  आहेत. त्यातच शिवसेना (शिंदे गट) नेत्या, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत त्या म्हणाल्या की, आनंद दिघेंवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दिघेंची भेट घेतली. ते गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात आनंद दिघेंना मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे आजही ठाणेकरांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. राजकारणाची पातळी घसरत चालली आहे. त्यात रोशनी शिंदेंचा नाहक बळी जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे रोशनी शिंदेंना पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे. 

“रोशनी शिंदेंची प्रकृती ठीक असल्याचे दोन डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तरीही रोशनी शिंदेंना सातत्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला जातोय, गंभीर असल्याचे भासवले जात आहे. गर्भवती नसताना, ती  गर्भवती  असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना बोलता येत नसल्याचे सांगितले जात आहे. हे का आणि कशासाठी चालले आहे, याचे गूढ अद्यापही उलगडले नाही. एकीकडे आजारपण दाखवले जात असताना, उद्या एखाद्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन देऊन मारले, तर आम्हाला कळणारसुद्धा नाही. त्यामुळे आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी रोशनी शिंदेंना मारहाण केली. त्यानंतर रोशनी शिंदेंना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता बुधवारी रोशनी शिंदेंना लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. रोशनी शिंदेंना काहीही झालेले नाही, असा दावा शिंदे गट सतत  करत आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest