संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या सभा, बैठका सुरू आहेत. अशातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अदिती तटकरे यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वरून त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
एक्सवर पोस्ट करत अदिती तटकरे काय म्हणाल्या?
"माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल."