विठ्ठलाला सूर्यफुलांची आरास
पंढरपुरात चैत्र एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. चैत्र महिन्यातील कामदा एकादशीनिमित्त पहाटे श्री विठूरायाची महापूजा झाली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.