सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 13 Jul 2023
  • 11:06 am
सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी ३० वर्षांचा असून, माझा नुकताच विवाह झाला आहे. आम्ही एका वेळी दोन-तीनदा सेक्स करतो. कधी मला खूप थकल्यासारखं वाटते, तर कधी माझी पत्नी लवकर दमते. एका वेळी कितीदा सेक्स करणे योग्य आहे?

- या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणताही निश्चित असा आकडा नाही. तुम्ही नवविवाहित आहात. त्यामुळे अशा गोष्टी होत असतील. कालांतराने वाढतं वय आणि जबाबदाऱ्या यामुळे कदाचित एका वेळी एकदाच होऊ शकेल. मात्र, सेक्समध्ये तुम्ही किती वेळा करता, हे महत्त्वाचं नसतं. तर, तुम्ही कसं करता हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे एकमेकांसोबतचा वेळ आनंदात घालवा आणि मजेत राहा.

थायरॉइडचा त्रास असल्यास शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा कमी होते का? त्याचा आणखा काही परिणाम होतो का?

- अर्थातच होतो. थायरॉइडचा त्रास विशेषतः महिलांना होत असतो. मात्र, त्याचा मानसिक आणि शारीरिक परिणाम कामजीवनावर होतो. तुम्हाला असा त्रास होत असल्यास, त्वरित डॉक्टरांना दाखवा आणि औषधोपचार घ्या.

मी २० वर्षांची तरुणी आहे. 'एसटीडी'ची (सेक्शुअली ट्रान्समिटेड डीसिज) चाचणी किती वेळा आणि किती अंतराने करणे आवश्यक असतं?

- तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल आणि असुरक्षित शरीरसंबंध झाले नसतील, तर अशी चाचणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, तुम्हाला योनीमार्गात काही त्रास होत असेल, त्याचसोबत ताप येत असेल, वेदना होत असतील, तर तुम्ही ती चाचणी करा. मात्र, या सर्व गोष्टी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच करा.  

मी २८ वर्षांचा असून, माझे नुकतेच लग्न झाले आहे. मात्र, आमच्यात अद्याप शरीरसंबंध आलेले नाहीत. आम्हाला दोघांनाही याबाबत थोडा संकोच वाटत आहे.

- तुम्ही एकमेकांना भरपूर वेळ द्या. विविध विषयांवर चर्चा करा. संवाद साधा. त्यामुळे तुमच्यातील अवघडलेपण दूर होईल आणि पुढील गोष्टी सोप्या होतील. प्रयत्न करूनही जर तुमच्यात त्या गोष्टी होतच नसतील, तर मात्र समुपदेशकाचा सल्ला घ्या. त्याला तुमची समस्या मोकळेपणाने सांगा.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story