सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 12 Jun 2023
  • 01:36 pm

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी २१ वर्षीय महिला असून एका महिन्यापूर्वीच विवाहबद्ध झाली. मला कायम नवऱ्याचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. त्याचे लक्ष कायम माझ्याकडे राहावे, यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्याला मी सर्वाधिक प्राधान्य देते. माझ्याव्यतिरिक्त त्याने कोणाशीही शारीरिक संबंध प्रस्थापित करू नये, हा माझा यामागील उद्देश आहे. यासाठी मी आणखी काय काय करायला हवे?

- नवीन लग्न झालेले असताना नवऱ्याचे लक्ष वेधून घेण्याला जास्त प्राधान्य देणे साहजिक आहे. पण तेवढ्याच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका. त्यापेक्षा तुमचे नातेसंबंध सर्वार्थाने दृढ करण्याला प्राथमिकता द्या. तुम्हा दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्यासत्याने केवळ माझ्यातच गुंतून राहावेही असुरक्षिततेच्या भावनेतून येणारी अगतिकता पूर्णपणे टाळा. जर तुमच्यातील बाॅंडिंग चांगली असल्यास आणि तुम्ही त्याला प्राधान्य देत असल्यास तो शारीरिक संबंधांसाठी दुसऱ्या महिलेचा विचार का करेल? बरोबर ना?

शीघ्रपतन रोखणाऱ्या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर किती काळाने त्याचा प्रभाव सुरू होतो?

- तुम्ही ज्या गोळीचे सेवन करीत आहात, त्यात असलेल्या वैद्यकीय घटकांवर ही गोष्ट अवलंबून असते. काही गोळीचे सेवन केल्यानंतर अर्ध्यात तासाने त्याचा प्रभाव सुरू होतो. काही गोळ्या शरीरसंबंधांच्या २ तासांपूर्वी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे थेट कालावधी सांगता येणार नाही.

नुकत्याच झालेल्या शरीरसंबंधांवेळी मी फ्लेव्हर्ड निरोध वापरले होते. त्यामुळे मला त्रास झाला. मी काय करू?

- तुम्हाला जर निरोध वापरण्याने त्रास होत असेल किंवा असं नेहमी होत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. मात्र, विशिष्ट कंपनी किंवा फ्लेव्हरबद्दलच असं होतय का, याचं निरीक्षण करा. तसं होत असल्यास ती कंपनी टाळा.

मी ३२ वर्षीय विवाहित पुरुष आहे. माझी बायको गेल्या काही दिवसांपासून विचित्र सवयीच्या आहारी गेली आहे. शरीरसंबंध आटोपला की लगेच तिची गादी स्वच्छ करायची गडबड सुरू होते. तिच्या या अतिस्वच्छतेच्या सवयीपायी मी वैतागलो आहे. माझ्या बायकोचे वर्तन नाॅर्मल आहे का?

- तुमच्या पत्नीचे वर्तन हे सामान्य सदरात मोडणारे नक्कीच नाही. त्यांना ओसीडी या मानसिक आजाराची लागण झाली असण्याची शक्यता आहे. यात व्यक्ती स्वच्छता, नीटनेटकेपणा याचा अतिरेक करत असते. दैनंदिन जीवनातही तिच्या अशा वर्तनात फरक पडला असेल तर तत्काळ डाॅक्टरांना दाखवा. जेणेकरून, हा आजार गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच तिच्यावर योग्य उपचार करता येतील.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story