सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

डॉ रोहन जहागीरदार (मानसोपचार तज्ज्ञ आणि तज्ज्ञ)

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 7 Jun 2023
  • 11:44 am

सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ

मी २९ वर्षांचा आहे. माझे वैवाहिक नाते आणि कामजीवन फारसे चांगले नाही. मला कधीकधी या नात्याचा खूप कंटाळा येतो. याबाबत मी काय करू? मला मार्गदर्शन करा.

- सर्वप्रथम तुम्ही ही गोष्ट तुमच्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. तुमच्या अडचणी, समस्या आणि प्रश्न अगदी स्पष्टपणे मांडा. त्यातून काही मार्ग निघत नसल्यास समुपदेशकाशी चर्चा करा. ते तुम्हाला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवा, एकत्र फिरायला जा. कोणताही टोकाचा निर्णय घेण्याआधी दहा वेळा विचार करा.

 

मी २५ वर्षांची तरुणी आहे. आमचे कामजीवन व्यवस्थित आहे. कामशास्त्रातील विविध आसने आम्ही करतो. मात्र, मला याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा आहे. सर्वांत जास्त आनंद कोणत्या आसनात मिळतो?

- शरीरसंबंधांमध्ये आनंद आणि समाधान या गोष्टी कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसतात. कामशास्त्रात अनेक आसनांची माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी खूपच थोड्या आसनांचा वापर सामान्यतः केला जातो. शरीरासंबंधी असलेल्या अडचणींमुळे अनेकांना खूप मर्यादा येतात. त्यामुळे तुम्हाला कशात अधिक आनंद मिळतो हे तुम्हीच शोधायला हवं. कोणताही त्रास न होता सहजपणे सर्व गोष्टींचा आनंद घ्या.

 

मी २४ वर्षांची स्त्री आहे. मला खूप थकवा जाणवतो आणि शरीरसंबंधांमध्ये रस वाटत नाही. मी नुकतीच रक्ततपासणी केली, त्यात बी १२ आणि डी ३ हे दोन व्हिटॅमिन कमी असल्याचे दिसून आले. याचा माझ्या कामजीवनावर काही परिणाम होईल का?

- होय. व्हिटॅमिन बी १२ आणि डी ३ च्या कमतरतेमुळे अनेक गोष्टी घडतात. शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नैराश्य वाढतं. मानसिक ताण येतो. तुम्ही वेळीच योग्य ते उपचार घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

माझी पत्नी माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलते. ती सतत तिला काय हवं, हे सांगत असते. सेक्सबद्दलही ती अनेक गोष्टी सांगते. तिच्या आवडी-निवडीवर बोलते. आमची खोली कशी सजवायची यावर बोलते. मात्र, हे सगळं सांगत असताना, ती फक्त स्वतःचा विचार करते किंवा मला आदेश देते, असं मला वाटतं. मी काय करू?

- काही लोकांना सर्व गोष्टी खूप नियोजनबद्ध करायच्या असतात. प्रत्येक गोष्ट ते ठरवून आणि वेळ घेऊन करतात. त्यासाठी नियोजन करतात. तुमची पत्नी बहुतेक अशा लोकांपैकी एक आहे. त्यामुळे ती जर सगळं व्यवस्थित करत असेल, तर तुम्ही तिला सहकार्य करा. मात्र, ती तुम्हाला आदेश देते, असं तुम्हाला वाटत असेल, तर तिच्याशी मोकळेपणाने चर्चा करा. संवाद साधा.

लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story