सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी २४ वर्षीय महिला आहे. शरीरसंबंधांदरम्यान मी आणि जोडीदाराने पाॅर्न चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे अनेक पोझिशन करून बघितल्या आहेत. यापैकी काही पोझिशन आम्हाला नीट जमू शकल्या नाहीत. असे सर्वांसोबत घडते का?
- पाॅर्न चित्रपटांमध्ये शरीरसंबंधातील अनेक गोष्टींचा कल्पनाविलास दाखवण्यात येत असतो. वास्तवात त्यामागे धावणे कधीही शक्य नसते. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही मिळून व्यवस्थित शरीरसंबंध प्रस्थापित करू शकत असाल तर तुम्हाला काही पोझिशन जमत नसल्याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही.
2) मी २० वर्षीय तरुण असून एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. एका महत्वाच्या विषयावर तुमचा सल्ला हवा आहे. दातदुखी असताना शरीरसंबंध ठेवता येतील काय?
- दातदुखी गंभीर असेल तर मला खात्री आहे की, शरीरसंबंधाचा विचार करण्याऐवजी तुम्ही डेंटिस्टकडे जाण्याला प्राथमिकता द्याल. शरीरसंबंध टाळण्यासाठी दातदुखीची समस्या हे कारण नक्कीच सांगता येऊ शकते. त्यादृष्टीने हा प्रश्न विचारत असाल तर तुमच्या नातेसंबंधांत गंभीर समस्या आहे. त्यासाठी वेळ न गमावता समुपदेशकाची मदत घ्या. खरंच दातदुखी असेल तर डेंटिस्टकडेही जाऊन या. दोघांचेही क्लिनिक एकाच मार्गावर असतील तर चांगलंच आहे. नाही का?
3) मी १९ वर्षीय तरुणी आहे. आतापर्यंत मी स्पर्म बघितलेला नाही. ज्यावेळी माझ्या बाॅयफ्रेंडचे पतन होते, तेव्हा पांढऱ्या रंगाचे वीर्य तेवढे मी बघितले आहे. मात्र मला स्पर्म बघायचा आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
- पांढर्या रंगाचा द्रवपदार्थ ज्याला वीर्य म्हणतात, हेच तुम्ही पाहू शकता. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला वीर्यातील स्पर्म बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला मायक्रोस्कोपची मदत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण मला खात्री आहे की, शरीरसंबंधाच्या वेळी स्पर्म बघता यावा म्हणून बेडवर तुम्ही मायक्रोस्कोप घेऊन बसणार नाही.
4) मी १९ वर्षीय तरुणी असून सेक्सबाबत थोडी वेगळी आहे. मला मुली आवडतात. अलीकडे एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून मी एका सुंदर मुलीला भेटले. मला ती खूप आवडली. पण तिच्या तोंडातून आणि शरीरातून दुर्गंध येतो. तिला हे सांगण्यात मला संकोच वाटतो.
- एखादी व्यक्ती स्वच्छ राहात नसेल आणि तिच्या शरीरातून दुर्गंधी येत असेल तर ती व्यक्ती एखाद्याला कशी काय आवडू शकते? तुम्ही हे तिला स्पष्टपणे सांगायला हवं. डेटिंगच्या विश्वामध्ये तोंडाची आणि शरीराची दुर्गंधी हे कारण नाते न फुलण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतात.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com