तळेगावात सात ठिकाणी हवेत गोळीबार, अज्ञात दुचाकीवरून फरार

दहशत माजविण्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या सात ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. 

तळेगावात सात ठिकाणी हवेत गोळीबार

दहशत माजविण्यासाठी मावळातील तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी वेगवेगळ्या सात ठिकाणी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.  (Talegaon Dabhade Firing)

घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अद्याप हवेत गोळीबार करण्याचं कारण समजू शकलं नाही. दहशत पसरविण्यासाठी हा गोळीबार केल्याचं प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे.

दोन दुचाकीवरून जाणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी सात ठिकाणी हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे येथे खळबळ उडाली आहे. हनुमान मंदिर आणि गजानन महाराज चौक, मारुती चौक, राजेंद्र चौक, शाळा चौक, गणपती चौक आदी ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला आहे. 

गोळीबार करताच अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवरून पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अद्याप हवेत गोळीबार करण्याचं कारण समोर आलेलं नाही. याबाबत तळेगाव पोलीस अधिक तपास करत असून याचे धागेद्वारे कोणाशी जोडलेले आहेत का? याचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest