पार्ट टाइम जॉब च्या बहाण्याने 51 लाखांची फसवणूक

पार्ट टाइम जॉब करून जास्तीचे पैसे कमावण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 51 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत पिंपळे गुरव येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

पार्ट टाइम जॉब करून जास्तीचे पैसे कमावण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 51 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत पिंपळे गुरव येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.

याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली आनंद, शैलेश भास्कर आणि अन्य अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी संपर्क करून त्यांना पार्ट टाईम जॉब केल्यास जास्त पैसे मिळतील असे आमिष दाखवून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. सुरुवातीला गुंतवणुकीवर फिर्यादीला 23 हजार 820 रुपये परतावा दिला. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना वेळोवेळी 51 लाख 34 हजार 99 रुपये पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्या नावे 77 लाख 43 हजार 700 रुपये जमा झाल्याचा खोटा अभिलेख तयार केला. फिर्यादी यांनी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आणखी ११ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता त्यांना कोणताही परतावा अथवा त्यांनी गुंतवलेली रक्कम परत न देता त्यांची 51 लाख 34 हजार 99 रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest