'तुने गलत लडकी से दोस्ती की' म्हणत तरुणाला जत्रेत जीवघेणी मारहाण

जत्रेमध्ये फिरायला गेलेल्या तरुणाला 'तुने गलत लडकी से दोस्ती की' म्हणत चाकूने व फळीने जीवघेणी मारहाण केली आहे, याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना चिखली पोलिसांनी ताब्यात केली आहे. ही घटना सोमवारी (२४ जून) चिखली (जाधववाडी) येथे घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 27 Jun 2024
  • 01:38 pm

संग्रहित छायाचित्र

जत्रेमध्ये फिरायला गेलेल्या तरुणाला 'तुने गलत लडकी से दोस्ती की' म्हणत चाकूने व फळीने जीवघेणी मारहाण केली आहे, याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना चिखली पोलिसांनी ताब्यात  केली आहे. ही घटना सोमवारी (२४ जून) चिखली (जाधववाडी)  येथे घडली आहे. 

याप्रकरणी सनी प्रविण मौर्या (वय १८, रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश उर्फ नन्या क्षिरसागर (वय २३, रा. चिखली) एजाज उर्फ अज्जु गणी शेख (वय २०, रा. चिखली) यांना अटक केली आहे. तर एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जत्रेमध्ये गेले असता आरोपी तेथे आले व त्यांनी विनाकारण फिर्यादीला मारण्यास सुरुवात केली. त्या वेळी आसपासच्या नागरिकांनी  वाचवण्याचा प्रयत्न केला असता चाकुचा धाक दाखवून आरडा ओरड करत दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादीला 'तुने गलत लडकीसे दोस्ती की आज तुझे जिंदा नही छोडेंगे' म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या गळ्याजवळ चाकू फिरवला. यावरून चिखली पोलिसांनी तिन ही आरोपींना अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest