पिंपरी-चिंचवड: दयानंद कनकदंडे यांची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड: समतावादी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे (३६ वर्षे) यांनी मंगळवारी (२५ जून) रात्री नऊच्या सूमारास दिघी येथील आपल्या राहत्या घराच्या गच्चीतून खाली उडी मारत आत्महत्या केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 27 Jun 2024
  • 01:36 pm

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: समतावादी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे (Dayanand Kanakdande) (३६ वर्षे) यांनी मंगळवारी (२५ जून) रात्री नऊच्या सूमारास दिघी येथील आपल्या राहत्या घराच्या गच्चीतून खाली उडी मारत आत्महत्या केली. त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक चळवळील सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दिघी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद कनकदंडे यांना गेल्या काही काळापासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी घर बाहेरून लॉक करून घेतले होते. त्यानंतर रात्री नऊ वाजता दयानंद यांनी तिसऱ्या मजल्यावरील आपल्या घराच्या गच्चीतून उडी मारत आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. दयानंद यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर चळवळीची मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest