संग्रहित छायाचित्र
आळंदी मधील दत्तनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी १० लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (२३ जून) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. वासुदेव नथू शेलार (वय ६५, रा. दत्तनगर, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलार यांचे घर शनिवारी (२२ जून) सकाळी दहा ते रविवारी सायंकाळी सात पर्यंत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख ५० हजार रुपये रोख रक्कम आणि १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update