संग्रहित छायाचित्र
लोणी काळभोर : सर्वजण देवदर्शनाला गेल्याने घरात कोणीही नाही यांचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह अडीच लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील चावट पाटील पार्कमध्ये घडली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सचिन कांतीलाल काळभोर ( वय ४५, रा. काळभोरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 380, 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन काळभोर हे व्यावसायिक असून त्यांनी चावट पाटील पार्कमध्ये बंगला बांधला आहे. ते सध्या कुटुंबासोबत तेथेच राहत आहेत. ते घरातील सर्व सदस्यांना घेऊन देवदर्शनाला गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. याची संधी साधून अज्ञात चोरट्याने १२ जून रोजी काळभोर यांच्या घराचा कडी कोयंडा तोडला. व घरात प्रवेश करून घरातील १० हजार रुपये रोख रक्कम व ४ तोळे वजनाचा सोन्याचा चोकर हार असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.
Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update