पुणे: जमिनीच्या वादामधून बिल्डरने शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल, मारण्याची दिली धमकी!

पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाने जमिनीच्या वादामधून एका शेतकऱ्यावर पिस्तुल रोखत त्याला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडीमध्ये घडलेला हा प्रकार समोर आला आहे.

जमिनीच्या वादामधून बिल्डरने शेतकऱ्यावर रोखले पिस्तुल, मारण्याची दिली धमकी!

पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाने जमिनीच्या वादामधून एका शेतकऱ्यावर पिस्तुल रोखत त्याला मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रांतवाडीमध्ये घडलेला हा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे. 

प्रभाकर भोसले (Prabhakar Bhosale) असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. रांजणगाव येथील एका शेतकऱ्याची जमीन भोसले यांनी विकत घेतली होती. घरासाठी पैसे देतो म्हणून भोसले यांनी शेतकऱ्याला अर्धीच रक्कम दिली. त्या नंतर उर्वरित पैसे दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या आधारे संबंधीत शेतकऱ्याने विश्रांतवाडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest