संग्रहित छायाचित्र
जेवणात गुंगीचे औषध देऊन महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. माधव संपत सोनटक्के (रा. मोमीन चिकन सेंटर शेजारी, फुगे प्रायमर मॉलजवळ, भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबत ४५ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. २५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३ ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आरोपीच्या घरी भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फ्लॅटचे पैसे घेऊन जाण्याकरिता आरोपीच्या घरी महिलेला बोलाविले. त्यानंतर फिर्यादी यांच्या जेवणामध्ये कसले तरी गुंगीचे औषध मिसळले. फिर्यादी महिलेला गुंगी आल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच फिर्यादी यांचे पती घरी नसताना आरोपीने पीडित महिलेला धमकी देऊन २५ डिसेंबर २०२१ व ३० डिसेंबर २०२२ रोजी तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.