संग्रहित छायाचित्र
पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या पोटात चाकूने भोकसून हातापायावर वार करत गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. २३) पहाटे तीन वाजताच्या सुमारास चाकण येथे घडली.
याप्रकरणी ३० वर्षीय जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सतीश उर्फ शिवा राजू धोत्रे (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. सतीश याने पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन शिवीगाळ करत तिच्याशी भांडण केले. घरातील भाजी कापण्याच्या सुरीने पत्नीच्या पोटात भोकसले. त्यानंतर दोन्ही हातापायावर वार करून पत्नीला गंभीर जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.