पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चंदन चोरट्यांच्या टोळीतील एकाला अटक

चंदन चोरट्यांना पकडणाऱ्या गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली होती. चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातून गोळीबार केला होता.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

चंदन चोरट्यांना पकडणाऱ्या गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावर घडली होती. चोरट्यांनी हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस शिपायाने पिस्तुलातून गोळीबार केला होता. 

या प्रकरणी आता पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आसिफ गोलवाल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. 

२२ ऑक्टोबर रोजी विधी महाविद्यालय रस्ता परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. या भागातील एका सोसायटीतील चंदनाचे झाड कापण्याच्या तयारीत चोरटे होते. चोरट्यांना पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला पण अचानकपणे पाच ते सहा चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्याकडील पिस्तूलातून चोरट्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या होत्या.

Share this story

Latest