Pune Crime News : शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी गजाआड, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

पुणे: शंभरपेक्षा अधिक गुन्ह्यात फरार असलेला आणि सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने बीटी कवडे रस्ता, वानवडी परिसरातून ताब्यात घेतले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 31 Oct 2024
  • 05:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी गजाआड, गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

पुणे: शंभरपेक्षा अधिक गुन्ह्यात फरार असलेला आणि सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने बीटी कवडे रस्ता, वानवडी परिसरातून ताब्यात घेतले. 

पापासिंग दयालसिंग दुधानी, (वय-५०, रा. पेरणे, बिराजदार नगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे युनिट ६ चे पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस नाईक नितीन मुंढे यांना रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी पापासिंग दुधानी हा बीटी कवडे रोड, वानवडी, पुणे येथे थांबला असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी  पापासिंग दुधानी याला सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावर त्याने हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली पोलिसांना दिली. पुढील तपासासाठी त्याला   हडपसर पोलीस ठाणे, पुणे यांच्या ताब्यात दिले आहे. 

दरम्यान, अधिक चौकशी केली असता आरोपीवर १०० पेक्षा जास्त घरफोडी व इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, सांगली येथील एकुण १२ गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी आहे. तसेच आरोपीवर यापुर्वी मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामधुन तो सध्या जामिनावर बाहेर आहे.

सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त पुणे अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, समीर पिलाने, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest