Pune Crime: ससून मधून पळालेल्या मार्शल लुईस लीलाकरला रात्री पोलिसांकडून अटक

पुणे: ससून मधून पळालेला मार्शल लुईस लीलाकरला रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने सोशल मिडियावरून शिवीगाळ केली होती

संग्रहित छायाचित्र

कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मिडियावरून केली होती शिवीगाळ

पुणे: ससून मधून पळालेला मार्शल लुईस लीलाकरला रात्री अडीचच्या सुमारास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुख्यात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना त्याने सोशल मिडियावरून शिवीगाळ केली होती. लीलाकर ११ फेब्रुवारी रोजी सकाळी सायबर पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पसार झाला होता.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना सोशल मीडियावर रीलद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ दिल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांनी आरोपी मार्शल लीलाकरला अटक केली. लीलाकरने त्याला सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात घेऊन आले होते. त्यावेळी त्यांची नजर चुकवून लीलाकर पसार झाला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर आणि गुन्हे शाखेचे पोलिस पथक नेरळ आणि कर्जत येथे पाठवण्यात आले होते.

दरम्यान, तो येरवडा येथील मावशीच्या घरी आल्याची माहिती सायबर पोलिसांन मिळाली.सायबर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली. आरोपी लीलाकरला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest