पाच हजारांची लाच घेताना अंमलदार जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई

उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ जून) बावधन वाहतूक विभाग येथे ही कारवाई केली.

Bribe

संग्रहित छायाचित्र

उत्खनन केलेल्या मातीची वाहतूक करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (२७ जून) बावधन वाहतूक विभाग येथे ही कारवाई केली. समाधान वालचंद लोखंडे (वय ३९), असे ताब्यात घेतलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,पोलीस नाईक समाधान लोखंडे हे बावधन वाहतूक विभाग कार्यरत आहेत. दरम्यान, उत्खननातील माती वाहून नेणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली.

तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता समाधान लोखंडे यांनी पैसे मगितल्याचे समोर आले. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बावधन चौकी समोर सापळा रचून लोखंडे यांनी पाच हजार रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले. त्यांच्यावर हिंजवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कामगिरी केली. तसेच, लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयाशी सपंर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest