संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या परवानगी शिवाय फ्लेक्स आणि क्यूऑक्स लावल्या प्रकरणी पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. वाकड येथे एका जिमच्या जाहिरातीचे फ्लेक्स आणि क्यूऑक्स लावल्या प्रकरणी जिम चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी पार्क वाकड येथील सिग्मा वर्ल्ड फिटनेस या जिम चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनपाचे आकाश चिन्ह व परवाना विभागातील परवाना निरीक्षक राजू वेताळ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्मा वर्ल्ड फिटनेस या जिमची नवीन वर्षाची जाहिरात करणारे फ्लेक्स चौधरी पार्क, शंकर कलाटे नगर रोड, पोस्टल कॉलनी, मुरारी पेट्रोल पंप या परिसरात लावले होते. पाच फ्लेक्स आणि ५० क्यूऑक्स मनपाची कोणतीही परवानगी न घेता लावल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.