संग्रहित छायाचित्र
बनावट कागदपत्रांचा सहाय्याने दोन व्यक्तींनी 496 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने कारवाई केली आहे.
जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेले दोघे आरोपी राजस्थान राज्यातील आहेत.
तक्रारीनुसार, आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने चार कंपन्यांची स्थापना केली. बनावट व्यवहार आणि कागदपत्रांच्या मदतीने त्यांनी 'इनपुट टॅक्स क्रेडिट'चा गैरवापर केला. यामुळे दोघांनी 496 कोटी 27 लाख रुपयांचा कर बुडवून फसवणूक केली.