Pimpri-Chinchwad Crime : लॉकडाऊन कालावधीत सांभाळले नाही म्हणून तरुणास मारहाण

लॉकडाऊन कालावधीत सांभाळले नाही म्हणून एका तरुणाला आणि त्याच्या आईला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 30 Dec 2024
  • 04:16 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लॉकडाऊन कालावधीत सांभाळले नाही म्हणून एका तरुणाला आणि त्याच्या आईला मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमर चव्हाण (वय २८, रा. आनंदनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन कालावधीत फिर्यादी यांच्या मुलाने आरोपी अमर चव्हाण याच्या घरच्यांना सांभाळले नाही, म्हणून त्याने फिर्यादी यांच्या घरी येऊन घरातील साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

टोळक्याकडून तरुणाला मारहाण

दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजता देहूरोड येथे घडली. मिथिलेश रमेश शिंदे (वय २१, रा. देहूरोड) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल टाक (वय २१), सुमित वाघमारे आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिथिलेश हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. देहूरोड बाजारातून जात असताना त्यांना आरोपींनी मारहाण केली. आरोपी सुमित याने बियरची बाटली मिथिलेश यांच्या डोक्यात फोडली. इतर आरोपींनी त्यांना खाली पाडून बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share this story

Latest