पुणे : गुंतवणुकदाराची १ कोटी १० लाखाची फसवणूक; फिर्यादीला दिली जीवे मारण्याची धमकी

पुणे: गुंतवणुकीवर जास्त नफा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराची १.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. ही घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे: गुंतवणुकीवर जास्त नफा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराची १.१० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. ही घटना  पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली आहे. 

याप्रकरणी आप्पासो दत्तात्रय शेंडगे (वय ५६) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मीकांत त्रिवेदी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. शेंडगे यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक केली आणि गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यास नकार देऊन जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पासो शेंडगे, पूर्वी मलेशियातील एका नामांकित कंपनीत डिझाईन सल्लागार म्हणून काम करत होते. शेंडगे २०१९ मध्ये भारतात परतले. लक्ष्मीकांत त्रिवेदी यांच्याशी त्यांची ओळख मलेशियातील मिलिंद वाणी यांच्यामार्फत झाली. २०२२० मध्ये पुण्यात परतल्यानंतर त्रिवेदी यांनी शेंडगे यांना त्यांच्या विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्रिवेदी यांनी त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक ३० टक्के परतावा देण्याचे वचन दिले.

त्रिवेदी यांच्या सांगण्यावरून शेंडगे यांनी धनादेशाच्या स्वरूपात ८१ लाख रुपये आणि रोख २९.५० लाख रुपये असे एकूण १.१० कोटी रुपये गुंतवले. या काळात त्यांनी डीसीबी बँक आणि ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या तारखांना धनादेश दिले. २०२१ मध्ये शेंडगे यांनी त्यांच्या गुंतवणुकीवर नफा आणि मूळ रकमेची मागणी केली तेव्हा त्रिवेदी यांनी ८१ लाखांचे चार धनादेश दिले. मे २०२२ मध्ये, शेंडगे यांनी हे धनादेश बँकेत जमा केले तेव्हा, "निधी नसल्यामुळे" सर्व धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर शेंडगे यांनी त्रिवेदी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धनादेश परत घेऊन प्रकरण रेटले. जून २०२२ मध्ये शेंडगे त्याचा मित्र शुभम शिंदे यांच्यासह नारायण पेठेतील त्रिवेदी यांच्या कार्यालयात पोहोचला. तेथे त्रिवेदी यांनी रक्कम परत करण्यास नकार तर दिलाच पण रागाच्या भरात त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्रिवेदी यांनी गुंतवणुकीच्या नावाखाली आपली फसवणूक करून कष्टाची कमाई हडप तर केलीच शिवाय मानसिक छळ केल्याचेही शेंडगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपी त्रिवेदी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ४०६, ४२०, ५०४ व ५०६ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे करत आहेत.

Share this story