Pune Crime News : पुण्यात खळबळ ! लघुशंका करताना हटकलं; वॉचमनला दगडाने मारहाण, गोळीबारात महिलेचा मृत्यू

पुणे : प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याचा राग आल्यानं ६ जनांनी सुरक्षारक्षकसह त्याच्या पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल नजीक

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 2 Jan 2025
  • 12:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

लघुशंका करताना हटकलं; वॉचमनला दगडाने मारहाण, गोळीबारात महिलेचा मृत्यू

पुणे : प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करत असताना हटकल्याचा राग आल्यानं ६ जनांनी सुरक्षारक्षकसह त्याच्या पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील जय मल्हार हॉटेल नजीक शुक्रवार (२७ नोव्हेंबर) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या महिलेचा लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयांमध्ये आज बुधवार (१ जानेवारी) रोजी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

शीतल अक्षय चव्हाण (वय ३०, रा. चव्हाणवस्ती, थेऊर ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सतीश बारीकराव लोखंडे (वय ३१, अजय दशरथ मुंढे (वय २६), भानुदास दत्तात्रय शेलार (वय ३२ सर्व रा. चिंबळी फाटा, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे  ३ साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत. याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण (वय ३१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय चव्हाण हे आपल्या कुटुंबासमवेत थेऊर येथील चव्हाणवस्ती परिसरात राहतात. ते थेऊर येथील एका प्लॉटिंगवर वॉचमन म्हणून काम करतात. शुक्रवारी फॉर्च्यूनर गाडीतून ६ जन आले व अक्षय चव्हाण हे काम करीत असलेल्या प्लॉटिंगच्या समोर लघुशंका करु लागले. त्यामुळे अक्षय चव्हाण यांनी त्यांना हटकले. यामुळे चिडलेल्या आरोपींनी अक्षय चव्हाण व शीतल चव्हाण या पती-पत्नीला दगड व हाताने मारहाण करून हवेत गोळीबार केला. त्यानंतर सर्वजण गाडीतून केसनंदच्या दिशेने निघून गेले. 

घटनेची माहिती मिळताच, पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी झालेल्या शीतल चव्हाण यांना तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी त्वरित तपासाची सूत्रे हलवून आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके तयार करून पाठविली. या घटनेची माहिती लोणीकंद व गुन्हे शाखा यूनिटला दिली.

 ्गुन्हे शाखा यूनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलिसांची पथके तत्काळ लोणीकंद तपास पथक व गुन्हे शाखच्या पाालसाना सापळा रचून मोठ्या शिताफीने फॉर्च्यूनर गाडी अडविली. गाडीतील आरोपी सतीश लोखंडे, अजय मुंढे व भानुदास शेलार यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक पिस्टल व काही काडतुसे जप्त केली आहेत. यावेळी त्यांचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहेत.

या मारहाणीत शीतल चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शीतल चव्हाण यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर आज १ जानेवारी रोजी मालवली.

गेले पाच दिवसांपासून शीतल चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल केले तेव्हा शीतलच्या डोक्याला थोडासा मार लागला होता. मात्र, आज दुपारी शितलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे शितलच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट व त्यांचे शंभर हून अधिक सहकारी रुग्णालयात दाखल झाले असून, रुग्णालय व रुग्णालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तसेच नातेवाईकांची समजूत काढण्यास पोलिसांनी यश मिळवले आहे.

Share this story

Latest