संग्रहित छायाचित्र
आपल्याकडे दैवीशक्ती असल्याची बतावणी करत एका भोंदूने महिलेवर चाकूच्या धाकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) या भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीच्या विरोधात बलात्कार तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिलेची ओळख होती. स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचा दावा करत आरोपीने केला होता. तसेच अंगात संचार होत असल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. या भोंदूने महिलेला जाळ्यात ओढले. नंतर तो फिर्यादी महिलेच्या घरी आला. यावेळी महिला आणि तिची दोन मुले घरात होती. आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली .
सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.