लुटमारीचा बनाव करून मालकाचे २३ लाख केले लंपास, पोलीसांनी कामगाराच्या आवळल्या मुसक्या

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायीकाने आपल्या कामगाराला कार्यालयात पोहोचण्यासाठी २३ लाख रुपयांची रक्कम दिली होती. मात्र, रस्त्यात टोळक्यांनी मारहाण करून आपल्याला लुटल्याचा बनाव करत कामगाराने २३ लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी दत्तवाडी पोलीसांनी कामगाराला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली आहे. ही घटना २३ मे रोजी घडली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 26 May 2023
  • 04:58 pm
Robbed : लुटमारीचा बनाव करून मालकाचे २३ लाख केले लंपास, पोलीसांनी कामगाराच्या आवळल्या मुसक्या

संग्रहित छायाचित्र

कर्ज फेडण्यासाठी कामगाराने मालकाचे चोरले होते २३ लाख रुपये

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायीकाने आपल्या कामगाराला कार्यालयात पोहोचण्यासाठी २३ लाख रुपयांची रक्कम दिली होती. मात्र, रस्त्यात टोळक्यांनी मारहाण करून आपल्याला लुटल्याचा बनाव करत कामगाराने २३ लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी दत्तवाडी पोलीसांनी कामगाराला अटक करून चोरीची रक्कम जप्त केली आहे. ही घटना २३ मे रोजी घडली आहे.

कामगार बसाप्पा वाल्मिक शिंगरे (वय ३६, रा. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसाप्पाला २३ मे रोजी आपल्या मालकाने २३ लाख रुपये रोख रक्कम कार्यालयात पोहोचवण्यासाठी दिली होती. मात्र, रक्कम कार्यालयात पोहोचवण्याऐवजी बसाप्पा घेवून पळून गेला. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात बसाप्पाविरोधात कलम ३८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, कामगार बसाप्पा रात्रीच्या सुमारास आपल्या मालकाकडे आला. यावेळी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलायम पुला शेजारी ४ अज्ञात चोरटयांनी आपल्या दुचाकीला स्वीफ्ट गाडी आडवी लावली आणि अपहरण करुन मारहाण केली. आपल्याकडील रोख रक्कम पळवली, असे कामगाराने आपल्या मालकाला सांगितले. त्यानुसार मालकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात कामगार बसाप्पा पळून गेला नव्हता, त्याला लुटले आहे, असा प्रकारची फिर्याद दिली. त्यानुसार दत्तवाडी पोलीसांनी कलम ३९२, ३६३, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. रोख रक्कम आणि दाखल दोन्ही गुन्ह्यांचे गांभिर्य लक्षात घेता पोलीसांनी तपासासाठी पाच पथके तैनात केली.

त्यानुसार, लॉ कॉलेज रोडपासुन विश्रामबाग हद्दीतील पेपर गल्ली ते दत्तवाडी पोलीस ठाणे निलायम पुल, स्वारगेट पासुन कोथरुड भुगाव परीसरपर्यंतचा तपास सुरू केला. या तपासात कामगार बसाप्पाबाबत संशय पोलीसांना बळावला. पोलीसांनी बसाप्पाची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली असता आपण लुटमारीचा बनाव रचल्याचे त्याने कबूल केले. आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी २३ लाख रुपये चोरल्याचे सांगितले. पोलीसांनी आरोपी कामगार बसाप्पाला अटक करून डेक्कन येथील एका हॉस्पीटलच्या आवारात पार्क करुन ठेवलेल्या त्याच्या अॅक्टीव्हा गाडीतुन पळवुन नेलेले २३ लाख रुपये गाडीसह जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest