संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे शहरात उद्या शनिवार पासून गणेशोत्सावाची सुरुवात होणार असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही भागातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. यामध्ये शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या तीन विभागातील दारुची सर्व दुकाने बंद राहणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ही माहिती त्यांनी दिली आहे. (Liquor shops closed during Ganesh festival Pune)
फरासखाना, विश्रामबाग आणि खडक या तीन विभागातील दारुची सर्व दुकाने संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात बंद ठेवण्याचा प्रस्ताव मान्य झाला असून पुणे शहरातील दिनांक ७ सप्टेंबर, १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर या तीन दिवसांत पुणे शहरातील सर्व दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतील. पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.