Pune Ganeshotsav 2024: गणेशोत्सवात याठिकाणी लावा वाहने; भाविकांसाठी ‘पार्किंग’ची व्यवस्था

पुणे : गणेशोत्सवात (Pune Ganeshotsav 2024) शहरातील मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक देखावे पाहण्यासाठी येत असतात. वाहनांवर फिरत फिरत अनेकजण देखावे पहात असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांच्या वाहनांना जागा मिळत नसल्याच्या देखील तक्रारी असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Sat, 7 Sep 2024
  • 06:22 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : गणेशोत्सवात (Pune Ganeshotsav 2024) शहरातील मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक देखावे पाहण्यासाठी येत असतात. वाहनांवर फिरत फिरत अनेकजण देखावे पहात असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांच्या वाहनांना जागा मिळत नसल्याच्या देखील तक्रारी असतात. त्यामुळे वाहतूक शाखेने देखावे पाहण्यासाठी तसेच गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी २७ ठिकाणी वाहने लावण्याची व्यवस्था केल्याची माहिती वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

शहराच्या (Pune) मध्यभागात मानाच्या गणपती आहेत. तसेच, मोठी मंडळे असतात. त्यांचे दर्शन, तसेच देखावे पाहण्यासाठी पुणे शहर, तसेच पर जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होते. उत्सवाच्या काळात परगावाहून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांना मोटारी, तसेच दुचाकी लावण्यासाठी २७ ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

मोटारी आणि दुचाकी वाहनांसाठीची पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे: न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग (दुचाकी), शिवाजी आखाडा, मंगळवार पेठ (दुचाकी ,चारचाकी), एच. व्ही. देसाई महाविद्यालय (पोलीस पार्किंग), हमालवाडा, नारायण पेठ (दुचाकी, चारचाकी), गोगटे प्रशाला, नारायण पेठ (दुचाकी), एसएसपीएमएस, शिवाजीनगर (दुचाकी, चारचाकी), स. प. महाविद्यालय (दुचाकी, चारचाकी), पीएमपीएल मैदान, पूरम चौक, सारसबाग (चारचाकी), पेशवे पार्क, सारसबाग (दुचाकी), हरजीवन हाॅस्पिटल, सारसबाग (दुचाकी), पाटील प्लाझा, मित्रमंडळ चौक (दुचाकी), पर्वती ते दांडेकर पूल (दुचाकी), दांडेकर पूल ते गणेश मळा (दुचाकी), गणेश मळा ते राजाराम पूल (दुचाकी), नीलायम चित्रपटगृह (दुचाकी, चारचाकी), विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना (दुचाकी), आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता (दुचाकी, चारचाकी), संजीवन रुग्णालय मैदान, कर्वे रस्ता (दुचाकी, चारचाकी)

आपटे प्रशाला (दुचाकी), फर्ग्युसन महाविद्यालय (दुचाकी, चारचाकी), जैन हाॅस्टेल, बीएमसीसी रस्ता (दुचाकी, चारचाकी), मराठवाडा महाविद्यालय (दुचाकी), पेशवे पथ (दुचाकी), रानडे पथ (दुचाकी, चारचाकी), काँग्रेस भवन रस्ता, शिवाजीनगर (दुचाकी), न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता (दुचाकी, चारचाकी), नदीपात्र, भिडे पूल ते गाडगीळ पूल (दुचाकी, चारचाकी)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest