सरकारकडून शेतकऱ्यांची लूट होतेय! - स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

सद्य:स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीये हे अतिशय धक्कादायक बाब आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांची लूट सुरू असून राज्यकर्त्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे लक्ष दिसत नाही

सरकारकडून शेतकऱ्यांची लूट होतेय! - स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप 

सद्य:स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीये हे अतिशय धक्कादायक बाब आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे. राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांची लूट सुरू असून राज्यकर्त्यांचे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे, ग्रामीण भागातील गरीब जनतेकडे लक्ष दिसत नाही, असा घणाघात स्वराज्य संघटनेचे प्रमुख युवराज संभाजीराजे (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आज (गुरूवारी) पुण्यात केला.  स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, " स्वराज्य पक्षाच्या वतीने शेतकरी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईन च्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांमधील अनेक सामान्य शेतकऱ्यांनी आमच्या कडे शेतीसाठी लागणारी खते, बी बियाणे, युरिया यांची वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी केल्या आहेत."

"काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाई देखील केली जाते अशी माहिती देखील आम्हाला मिळाली.

या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹२६६/- रुपयांना मिळणारी गोणी तब्बल २८००/- रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबत चे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. विक्री किमतीपेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे. (Swarajya Sanghatna)

मागील महिन्यातच स्वराज्य च्या वतीने राज्याच्या कृषी आयुक्तांना अधिकच्या दराने होत असलेल्या विक्री तसेच बोगस खते व बियाणे या बाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या बाबत निवेदन सादर केले होते. काही कारणास्तव या नंतर २ दिवसातच कृषी आयुक्तांची बदली झाली. सध्या राज्याला पूर्णवेळ कृषी आयुक्तच नाही. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक व्हॉट्सअँप नंबर प्रकशित केलेला आहे. परंतु या व्हॉट्सअँप नंबर वर आपल्या तक्रारींना न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्यामुळे नागरिक आमच्याकडे जास्त तक्रारी करत असल्याचे दिसून येत नाही."

"राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची लूट सुरू असताना कृषी मंत्री ग्राउंड वर येऊन काम करणे अपेक्षित असताना, हे कृषी मंत्री whats app नंबर फेसबुक द्वारे जाहीर करून ऑनलाईन तक्रारी मागवत आहेत. हे अपेक्षित नाहीये. कृषी मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करणे आवश्यक आहे."

राज्यभरात शेतकऱ्यांना अशाप्रकारे लुटले जात असताना कृषी खाते झोपा काढत आहे का?

राज्यात सर्वत्र लूट सुरू असून याबाबत स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यातील सर्व भागांमध्ये जाऊन परिस्थिती वर लक्ष ठेवणार आहे. शेतकऱ्यांची जीएसटीद्वारे लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हायला हवी. मागच्या वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विमा अग्रीम आणि विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest