Pune News : फातिमानगर चौकातील सिग्नल होणार बंद

सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीची समस्या आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने फातिमानगर चौकामध्ये सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:01 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी नेहमीची समस्या आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेने फातिमानगर चौकामध्ये (Fatimanagar Chowk) सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे वाहतूक शाखेचे नियोजन आहे. हा वाहतूक बदल वानवडी वाहतूक विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आहे.

वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, शिवरकर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भैरोबानाला चौकाअगोदर वळावे (यू टर्न) घ्यावा. तेथून सोलापूर रस्त्याने जावे. या मार्गावरून फक्त दुचाकी, तीन चाकी आणि मोटारींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या बस मालवाहू वाहनांनी भैरोबानाला चौकातील पेट्रोलपंपाला वळसा घालून सोलापूर रस्त्याकडे जावे. स्वारगेटकडून वानवडीतील शिवरकर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी भैरोबानाला चौकात उजवीकडे वळावे. वानवडी बाजार पोलीस चौकीमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

स्वारगेटकडून भैराबानाला चौकातून वानवडीतील शिवरकर रस्त्याकडे जाणाऱ्या दुचाकी, तीनचाकी, मोटारचालकांनी फातिमा नगरवरून सरळ जावे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस प्रवेशद्वार क्रमांक दोन (अव्हेन्यू मॉलच्या अलीकडे) वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वानवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी केले आहे. या बदलामुळे काही प्रमाणात सोलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest