पुणे: ‘रिंग रोड’ शेजारील ११७ गावांचा विकास करणार ‘एमएसआरडीसी’

पुणे : पुण्यामधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच, विशेषत: महामार्गावरील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी वर्तुळाकार मार्ग प्रकल्प (रिंग रोड) तयार केला जात आहे. या रिंगरोड लगत असलेल्या ११७ गावांचा विकास करण्यासाठी ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’ला

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Tue, 22 Oct 2024
  • 05:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती , ११७ गावांमधील ६६८ चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी निर्णय

पुणे : पुण्यामधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच, विशेषत: महामार्गावरील वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठी वर्तुळाकार मार्ग प्रकल्प (रिंग रोड) तयार केला जात आहे. या रिंगरोड (Ring Road) लगत असलेल्या ११७ गावांचा विकास करण्यासाठी ‘राज्य रस्ते विकास महामंडळा’ला (एमएसआरडीसी MSRDC) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या गावांचे एकूण क्षेत्र ६६८ चौरस किलोमीटर आहे. या संपूर्ण क्षेत्राचा विकास ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून केला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘रिंगरोड’च्या अंमलबजावणीसाठी ‘एमएसआरडीसी पुणे रिंग रोड लिमिटेड’ (एमपीआरआरएल) या नावाने एका कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.

‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून १७२ किलोमीटर लांबीचा आणि ११२ मीटर रुंदीचा ‘रिंग रोड’ तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पालगतच्या ११७ गावांच्या विकासाबाबत नियोजबद्ध काम करण्यासाठी एमएसआरडीसीची नियुक्ती करण्यात आली आहे. या ‘रिंगरोड’ लगतच्या गावांमध्ये दोन आर्थिक विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसा प्रस्ताव ‘एमएसआरडीसी’कडून नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आत्यारीतील ६६८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावरील हवेली भोर, पुरंदर तालुक्यांतील ६२ गावांमध्ये एक आणि हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यांतील ५५ गावांमध्ये एक अशी दोन आर्थिक विकास केंद्र विकसित केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest