Pune Fire News : वडकी येथे एका गोडाऊनमध्ये मध्यरात्री आगीची घटना

पुणे - काल मध्यरात्री १२•०५ वाजता सासवड रस्ता, वडकी, पवार मळा येथे एका गोडाऊनमध्ये आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून काळे बोराटे नगर, हडपसर व कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथून

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 02:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे - काल मध्यरात्री १२•०५ वाजता  सासवड रस्ता, वडकी, पवार मळा येथे एका गोडाऊनमध्ये आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाकडून काळे बोराटे नगर, हडपसर व कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथून एक वॉटर टँकर अशी एकुण तीन वाहने रवाना करण्यात आली होती. 

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, पञ्याचे शेड असलेले  अंदाजे तीस बाय वीसचे गोडाऊन पुर्णपणे आगीने वेढले गेले आहे. प्रथम जवानांनी आतमध्ये कोणी नाही याची खाञी करत मुख्य दरवाजा अग्निशमन उपकरण वापरुन तोडत आतमध्ये प्रवेश केला. चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू करत आग आटोक्यात आणत पुर्ण विझवत धोका टाळला. सदर गोडाऊन दोन भागामध्ये विभागले असून रद्दी, काचेच्या बाटल्या, मोबाईल बॅटरी, पुठ्ठा व इतर भंगार मालाचा साठा होता जो पुर्ण जळाला. यामध्ये तिथे असलेली एक दुचाकी ही जळाली. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने यामध्ये जखमी वा जिवितहानी नाही. 

सदर कामगिरीत वाहनचालक उत्कर्ष टिळेकर, चंद्रकांत जगताप, प्रशांत मखरे तसेच तांडेल महेंद्र कुलाळ व जवान राजीव टिळेकर, सोमनाथ मोटे, राहुल दळवी, निलेश करणे, विकास गायकवाड, विजय चव्हाण, अजिंक्य खाडे यांनी सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest