मृत समजल्या गेलेल्या दुबईतील भारतीय तरुणाला जीवदान; पुण्यात आणून उपचार सुरू, कुटुंबाला मिळाला दिलासा

पुणे : कामाच्या निमित्ताने बरेच भारतीय आता परदेशी जाऊन राहतात. मात्र, परदेशात जेव्हा कोणत्याही कारणाने त्यांच्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला वाली कोण, अशी भीतीसुद्धा त्यांना वाटतेच! दुबईत राहणाऱ्या एका भारतीय तरुणावर अशीच वेळ आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : कामाच्या निमित्ताने बरेच भारतीय आता परदेशी जाऊन राहतात. मात्र, परदेशात जेव्हा कोणत्याही कारणाने त्यांच्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला वाली कोण, अशी भीतीसुद्धा त्यांना वाटतेच! दुबईत राहणाऱ्या एका भारतीय तरुणावर अशीच वेळ आली. परंतु, पुण्यात राहून जगभरात मदतीचा हात देणाऱ्या ‘रेडियो वेलफेअर फाउंडेशन’ या संस्थेने त्याला योग्य वेळी मदतीचा हात दिला आणि त्याला जीवनदान दिले.

भारतात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना वाटणारी काळजी आणि भीती साहजिक आहे. परंतु भारतात आणि भारताबाहेर जगभरातच अश्या अनेक संस्था कार्यरत आहे,ज्यांच्या समजकार्यामुळे परदेशी राहणाऱ्या भारतीयांना आणि भारतातील त्यांच्या घरच्याना दिलासा मिळतो. या पैकीच एक म्हणजे पुण्यातील ‘रेडियो वेलफेअर फाउंडेशन’ ही संस्था. ही संस्था परदेशात अडचणीत असलेल्या भारतीयांना मदतीचा हात देते. तसेच दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह मायदेशी आणून त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे विधायक काम करते.

नुकतेच दुबईतील एका भारतीय तरुणाला जीवनदान देण्यात आले. दिलीप जाधव हे मूळचे हिंगोली येथील रहिवासी असून गेली ७ वर्षं ते दुबईत वास्तव्यास होते. दुबई येथील एका हॉटेलमध्ये रूम अटेंडंट म्हणून ते कार्यरत होते. कामावर असताना उंचावरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि डोक्याला मार लागला. दुबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. इथे भारतात त्यांच्या कुटुंबियांना मात्र त्यांचे निधन झाले आहे असे समजले.

रेडियो फाउंडेशनचे दुबईतील समन्वयक वसंत लोटलीकर यांनी तेथील भारतीय दूतावासात संपर्क साधला. जाधव हे जिवंत असून एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांना समजले. त्यांनी ही बातमी रेडियो फाउंडेशनच्या पुण्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या धनश्री पाटील यांच्या कानावर घातली. दिलीप जाधव हे सुखरूप असल्याचे त्यांच्या कुटुंबियांना पाटील यांनी कळवले. जाधव यांच्या घरच्यांना आनंद अवर्णनीय होता.

दिलीप यांच्यावर दुबई येथे चार कठीण अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कवटीचा अर्ध भाग काढून टाकावा लागला होता. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा कोट्यवधीचा खर्च दुबईतील सामाजिक कार्यकर्ते कौसर बेग यांच्या होप फाउंडेशनतर्फे करण्यात आला. पुढील उपचारांसाठी मात्र दिलीप यांना भारतात आणणे गरजेचे होते. रेडियो संस्थेचे संस्थापक डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि परराष्ट्र मंत्रालायचे माजी सचिव यांच्या मदतीने त्यांना भारतात आणण्याचे निश्चित झाले. त्याची संपूर्ण जबाबदारी धनश्री पाटील यांना देण्यात आली. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. विमानाने त्यांना भारतात आणून त्यांच्यावर ससून रुग्णालयात मेंदू उपचार विभागात दाखल करण्यात आले.

पुण्यातील भोई संस्थेचे डॉ. मिलिंद भोई आणि डॉ.केदार भोई तसेच विभागप्रमुख असलेले डॉ.गिरीश बारटक्के यांच्या मदतीने दिलीप जाधव यांच्यावर कृत्रिम कवटी बसवण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता दिलीप यांची तब्येत सुधारली असून लवकरच ते पूर्णपणे बरे होतील असे सांगण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest