पुणे: लोहगावमधील उद्यानाच्या आरक्षित जागेवर कोणाचा डोळा?

लोहगाव भाग महापालिकेत समावेश होऊन सात वर्षे झाली आहेत. आरक्षित जागा असतानाही उद्यानासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर आली असून या आरक्षित जागेवर कोणाचा डोळा आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 28 Sep 2024
  • 01:32 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लोहगाव भाग महापालिकेत समावेश होऊन सात वर्षे झाली आहेत. आरक्षित जागा असतानाही उद्यानासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ नागरिकांवर आली असून या आरक्षित जागेवर कोणाचा डोळा आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 

सात वर्षांपूर्वी वाघोलीसह लोहगाव भागाचा पालिकेत समावेश झाला. त्यानंतरही  विकासकामे झाली नसून एवढ्या मोठ्या भागात आबालवृद्धांच्या विरंगुळ्यासाठी उद्यान नाही. यामुले अनेकांना येरवडा, धानोरी, वडगाव शेरी आदी भागातील उद्यानात मुलांना घेऊन जाण्याची वेळ येते. त्यामुळे पालिकेने लोहगाव-वडगाव शिंदे मार्गालगत हरणतळे वस्ती येथील गायरान जागेपैकी काही जागा उद्यानासाठी आरक्षित केली. आरक्षित जागेवर कोणी अतिक्रमण करू नये, याकरिता परिसरात लोखंडी कंपाऊंड बनविले असून उद्यान झाले नसल्याने जागा तशीच पडून आहे.

सध्या मोकळ्या जागेत झाडे-झुडपे वाढली असून दोन-चार ठिकाणी गुरांसाठी शेड उभारून अतिक्रमण केले आहे. यामुळे उद्यानावर अतिक्रमण करून जागा हडप  करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे. परिसरातील बालगोपाळांना खेळाचा आनंद घेता यावा यासाठी पालिकेने उद्यान उभारावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या संदर्भात उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोहगाव भागाचा पालिकेत समावेश होऊन सात वर्षे झाली आहेत. येथील नागरिकांसाठी उद्यानाची गरज असून त्यासाठी पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- बंडू खांदवे,  माजी सभापती, पंचायत समिती

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest