पुण्यात पावसाने मोडला तब्बल ८६ वर्षांचा विक्रम; सप्टेंबरमधील २४ तासांत झाली १३३ मिमी पावसाची नोंद

गणपती काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने बुधवारी विक्रम केला. गेल्या २४ तासांत तब्बल १३३ मिमी पावसाची नोंद झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 06:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

गणपती काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने बुधवारी विक्रम केला. गेल्या २४ तासांत तब्बल १३३ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी २१ सप्टेंबर १९३८ रोजी १३२.३ मिमी पाऊस पडला होता. त्या खालोखाल २६ सप्टेंबर १९७१ रोजी ११५.३ मिमी, १९ सप्टेंबर १९८३ रोजी ११०.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. तब्बल ८६ वर्षांनी पावसाने आपला रेकॉर्ड मोडला.

शहर आणि उपनगरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी (२६ सप्टेंबर) पावसाचा जोर कमी झाला. दुपारनंतर तुरळक सरी पडल्या. दिवसभरात शिवाजीनगरमध्ये फक्त चार मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी काही ठिकाणी पाऊस झाला तर बुधवारी मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या २४ तासांमध्ये पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहर परिसराला अक्षरशः झोडपले आहे. पावसाने पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. एवढेच काय मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे पंतप्रधान मोदींना आपला दौराही रद्द करावा लागला. पुण्यात पावसाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

पुण्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ५ ऑक्टोबर २०१० नंतर पुण्यात प्रथमच एवढा पाऊस झाला आहे. संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सायंकाळी अचानकपणे आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचले. यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली. गेल्या २४ तासांमध्ये झालेला पाऊस हा सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे.

यापूर्वी १९३८ मध्ये १३२.२ मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच तब्बल ८६ वर्षांनी पावसाने आपला रेकॉर्ड मोडला आहे. पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळीदेखील अनेक भागांत पाऊस बरसताना दिसून आला.  मुंबई, पुण्यासह सातारा जिल्ह्यातील मायणी येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली असून, मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते अक्षरश: पाण्याखाली गेल्याचे पाहायला  मिळते. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या भागातील पिकांचे नुकसानही झाले. पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये घुसले आहे.  घाटमाथा, जिल्हा आणि धरणक्षेत्रांतही समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली असली, तरी यंदाचा हंगाम चांगला असेल, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, असे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मे मध्ये दिले होते.

हवामानातील अनुकूल घडामोडींमुळे ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये दहा वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात शहरात २७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जून, जुलै या महिन्यांतही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला.

आजवरचा पाऊस (२४ तास, मिमी)

२१ सप्टेंबर १९३८.......१३२.३ मिमी

२६ सप्टेंबर १९७१.......११५.३ मिमी

१९ सप्टेंबर १९८३.......११०.७ मिमी

२५ सप्टेंबर २०२४.........१३३ मिमी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest