पुणे: नवरात्रीमध्ये यंदा चतु:श्रुंगी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

पुण्यातील प्रसिध्द चतु:श्रुंगी मंदिरात यंदा नवरात्र उत्सवात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी जाहीर केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 28 Sep 2024
  • 06:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुण्यातील प्रसिध्द चतु:श्रुंगी मंदिरात यंदा नवरात्र उत्सवात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिराच्या विश्वस्तांनी जाहीर केले आहे.

नवरात्रीची कामे पूर्णत्वास गेली असून नवरात्रात भाविकांसाठी मंदिर २४ तास उघडे राहणार आहे. दोन कोटी रुपये खर्च करुन यंदा मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम झाले असून उर्वरित बांधकाम आणि परिसराचे सुशोभीकरण पुढील आठ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. नवरात्रात दहा लाख भाविक मंदिरात देवीच्या दर्शनास येण्याचे अपेक्षित असून भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा दोन कोटींचा विमा काढण्यात आला आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अमित अनगळ व कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest