पुणे: राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीस पदी राजेंद्र पवार

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाच्या शहर सरचिटणीस पदी राजेंद्र देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 02:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे: राष्ट्रवादीच्या शहर सरचिटणीस पदी राजेंद्र पवार

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाच्या  शहर सरचिटणीस पदी राजेंद्र देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष महेबुबभाई शेख, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार राजेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. राजेंद्र यांनी यापूर्वी वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या माथाडी सेलच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी पवार यांची निवड केल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. पक्षनिष्ठा ठेवून पक्ष वाढीसाठी काम करण्यास तसेच युवकांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास राजेंद्र यांनी व्यक्त केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest