पुणे: शिवाजीनगर-स्वारगेट मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त रविवारी वाहतूकीत बदल

पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे रविवारी (२९ सप्टेंबर) उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 28 Sep 2024
  • 06:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे रविवारी (२९ सप्टेंबर) उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शिवाजीनगर न्यायालय परिसर, स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसर आणि गणेश कला क्रीडा केंद्र परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.

मेट्रो मार्गिकेचा उद्घाटन सोहळा रविवारी सकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende) यांनी केले आहे.

गणेश कला क्रिडा केंद्र व स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसर वाहतूक बदल 
जेधे चौक ते बजाज पुतळा रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी सात वाजेपासून ते आवश्यक वेळेपर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.  जेधे चौक ते बजाज पुतळा चौकदरम्यान आवश्यकते नुसार दुहेरी वाहतुक सुरु करण्यात येईल.  तसेच आवश्यकतेनुसार या भागातील वाहतूक बंदही ठेवण्यात येईल. वाहनचालकांनी जेधे चौकातून व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्त्याने उड्डाणपुलावरुन सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.

शिवाजीनगर न्यायालय परिसर वाहतूक बदल
शिवाजीनगर न्यायालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्ता परिसरात सकाळी सहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते कामगार पुतळा चौक मार्ग आवश्यकता भासल्यास दुहेरी करण्यात येईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest