एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी कुटुंब दत्तक योजना; नॅशनल मेडिकल कमिशनचा उपक्रम

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या आणि एमबीबीएस प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासून लोकांचे आरोग्य तपासण्याची संधी

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या आणि एमबीबीएस प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार आहे.

तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने २०२३-२४ च्या सर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांना कुटुंब दत्तक म्हणजे फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्रॅम लागू केला आहे. 

११ जून ते ७ ऑगस्ट या काळात २८ राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांत हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आले होते. यामध्ये देशातील ४९६ मेडिकल कॉलेजच्या ८५ टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर एनएमसीने एक अहवाल तयार केला आहे. यामध्ये लोकांना मोठ्या संख्येने बीपी, शुगर, रक्तात लोहाची कमतरता आदी आजार असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या लोकांना याची माहितीच नव्हती. हा अहवाल एनएमसीच्या पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा व्ही. वणीकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे. 

डॉ. वणीकर म्हणाल्या, वर्गात शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षापासून लोकांची आरोग्य तपासणी करण्याची संधी देण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येईल. एमबीबीएसला प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने पहिल्या वर्षापासूनच कुटुंब दत्तक घेण्यास सुरुवात करावी. कम्युनिटी आउटरीच कार्यक्रमांतर्गत किती कुटुंबांना मदत झाली हे देखील त्या कुटुंबाला भेट देऊन पाहिले जाणार आहे. महाविद्यालयांकडून ग्रामीण भागातही कॅम्प आयोजित केले जातील.

असे आहे वेळापत्रक
वैद्यकीय अभ्यासक्रमाला घेतलेला प्रवेश रद्द करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना बुधवार (ता. २५) पर्यंत मुदत आहे. यानंतर दुसऱ्या फेरीसाठी रिक्‍त जागांचा तपशील गुरुवारी (ता. २६) प्रसिद्ध केला जाईल. इच्‍छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यासाठी २७ ते २९ सप्‍टेंबर अशी मुदत असेल. ३० सप्‍टेंबरला दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १ ते ४ ऑक्‍टोबर अशी मुदत दिली जाईल. यानंतर पुढील दहा दिवस तांत्रिक प्रक्रिया पार पडल्‍यानंतर १५ ऑक्‍टोबरपासून तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल.

रिपोर्टमध्ये काय ?
चाळीस हजार मुलांपैकी ३१ टक्के मुले ॲनिमियाग्रस्त असल्याचे समोर आले आहे. ३८ टक्के महिलांमध्ये ही समस्या असल्याचे दिसले आहे. २.७३ लाख कुटुंबातील १२.०९ लाख लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यापैकी १७ टक्के लोकांना बीपीची समस्या आणि १४ टक्के लोकांना मधुमेहाची समस्या आढळली आहे. शिबिर आणि डोअर टू डोअर जात आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्‍या पहिल्‍या फेरीला राज्‍यभरात उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या फेरीनंतर अवघ्या काही जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्‍यानुसार दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवार (ता. २७) पासून सुरू झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नॅशनल एंट्रन्स कम इलिजिब्‍लिटी टेस्‍ट (नीट) परीक्षा घेण्यात आली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest