पुणे: शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद, सायंकाळी सहापर्यंत तात्पुरती व्यवस्था केली जाणार

पुणे: शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. विद्युत पुरवठ्यासाठी असलेल्या पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पंपींग बंद होऊन पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Sat, 29 Jun 2024
  • 03:35 pm
pune water supply news

संग्रहित छायाचित्र

पुणे: शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा (pune water supply news) विस्कळीत झाला आहे. विद्युत पुरवठ्यासाठी असलेल्या पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पंपींग बंद होऊन  पाणीपुरवठा विस्कळीत झाला. 

आज (२९ जून) सकाळी ६.३० वाजता खडकवासला जॅकवेल (पर्वती ५०० एमएलडी) या ठिकाणी विद्युत पुरवठ्यासाठी असलेल्या २२ के व्ही पॅनेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पंपींग बंद होऊन शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेकडून  दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. आज सायंकाळी ६ पर्यंत ताप्तुरती व्यवस्था करुन पंपींग यंत्रणा चालू करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून देण्यात आली आहे. तसेच पालखी मार्ग आणि वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे सुरळीत ठेवण्यात येणार आहे. 

दुरूस्ती कालावधीपर्यंत खालील भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. या भागांत रात्री १२.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

१. पर्वती एच.एल.आर टाकी परिसर -  सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, गंगाधाम परिसर

२. एसएनडीटी एच.एल.आर टाकी -  गोखलेनगर, कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, चतुश्रृंगी परिसर

३. लष्कर जलकेंद्र -  संपुर्ण हडपसर, रामटेकडी, सोलापुर रोड, कोरेगाव पार्क, महंमदवाडी, रेसकोर्स, कोंढवा परिसर, खराडी परीसर, येरवडा

४. वडगाव जलशुध्दीकरण केंद्रा अंतर्गत - संपुर्ण कात्रज, आंबेगाव, धनवकवडी, केदारेश्वर टाकी परिसर, सुखसागरनगर


Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest