पुणे: मेट्रो स्टेशनवर एस्केलेटरवरून पडून प्रवाशाचा मृत्यू

पुणे: जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. एस्केलेटरवरून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

pune, punenews, punemetro, civilcourtmetrostation

संग्रहित छायाचित्र

पुणे: जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली.  एस्केलेटरवरून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

सोमवारी (१ जुलै) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मनोज कुमार (वय अंदाजे ४०) हे प्रवासी अचानक एस्केलेटरवर पडले. त्यांना तातडीने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावरील डॉक्टरने प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना नजदीकच्या संचेती रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

मेट्रो अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना ह्या घटनेची माहिती दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest