पुणे : गुरुवारी वडगाव जलकेंद्र परीसरातील पाणीपुरवठा बंद

गुरूवारी (दि. ११ एप्रिल २०२३) वडगाव जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 8 May 2023
  • 04:20 pm
पुणे : गुरुवारी वडगाव जलकेंद्र परीसरातील पाणीपुरवठा बंद

Water supply

सकाळी ९ ते ५ यावेळेत राहणार बंद

पुण्यातील वडगाव जलकेंद्र येथे महावितरण कंपनीच्या २२ KV येणाऱ्या विद्युत वाहिनीवर तातडीचे व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. ११ एप्रिल २०२३) वडगाव जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे.

तसेच गुरूवार सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. त्याचबरोबर पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest