शिवाजीनगरमध्ये पुन्हा शिरोळेंचाच वरचष्मा

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीपासून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात लढत झाली होती. या विधानसभा निवडणुकीमध्येदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत झाली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शिवाजीनगरमध्ये पुन्हा शिरोळेंचाच वरचष्मा

बालेकिल्ल्यात काँग्रेसला पुन्हा धक्का, चुरशीच्या लढतीत दत्ता बहिरट पुन्हा पराभूत

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीपासून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात लढत झाली होती. या विधानसभा निवडणुकीमध्येदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, गेल्या पराभवाचा वचपा यावेळी तरी दत्ता बहिरट काढतील अशा चर्चा असताना मात्र, अगदी पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी मताची आघाडी घेत ३६ हजार ६१४ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. सिद्धार्थ शिरोळे यांना ८४ हजार ६८५ मते मिळाली आहेत तर  बहिरट यांना ४७, ८७१ मते मिळाली आहेत.

काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढलेले मनीष आनंद यांना १२ हजार ६८७ मते मिळाली आहेत. भाजपकडून ज्यावेळी उमेदवारांची पहिली यादी समोर आली. त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, तर दुसरीकडे काँग्रेसमधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांना पुन्हा संधी देण्यात आलेली होती. शिवाजीनगर मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही शिवाजीनगरमधून भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे हा मतदारसंघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजप पक्षाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाले होते.

भाजपचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय? अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांनी मोठा विजय मिळवत मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केल्याचे दिसून येत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारून विजय मिळवला.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपने २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग तीन वेळा विजय मिळविला. मागच्या वेळी धाकधूक होती. मात्र यंदा पहिल्या फेरीपासून सिद्धार्थ शिरोळे यांनी मताची आघाडी घेतली होती. ती आघाडी विजयापर्यंत सुरूच होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest